|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कला अकादमीत आज सं. ‘धनुर्भंग’

कला अकादमीत आज सं. ‘धनुर्भंग’ 

वार्ताहर/ पालये

कोरगाव-पेडणे येथील श्री कमलेश्वर महारुद्र कलामंचतर्फे श्री आजोबा कुलदेवता रवळनाथ महिला मंडळाचा (केरी-पेडणे) नारायण रामलींग बाबणगावकर लिखित व दिलीप गोसावी दिग्दर्शित सं. ‘धनुर्भंग’ या नाटय़प्रयोगाचे कला अकादमी पणजीत सुरू असलेल्या स्व. तुकाराम फोंडेकर स्मृती संगीत नाटय़ महोत्सवात गुरुवार 23 रोजी संध्याकाळी 7 वा. मा. दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात सादरीकरण होणार आहे.

संगीत / ऑर्गनसाथ राजीव बर्वे यांची लाभलेली असून तबलासाथ, प्रकाशयोजना, रंगभूषा, नेपथ्य, ध्वनिसंकलन आदी बाजू अनुक्रमे दामोदर शेटये, गौतम बर्वे, गौरव बर्वे, साबाजी मोपकर, किशोर नाईक, कृष्णा शं. नाईक यांनी सांभाळलेली आहे. कृष्णा शं. नाईक निर्माते आहेत. यात तन्वी पार्सेकर, झीनत चोपडेकर, प्रणाली मयेकर, सविता पराष्टेकर, संजना तळकर, चंदा तळकर, दीपा तळकर, भुवी तळकर, अनिशा केरकर, नम्रता तळकर, सुनिता तळकर, प्रिया रेडकर, मीनाली तळकर, रिया केरकर, निलिमा तळकर, प्रशुदा तळकर, शेफाली तळकर यांच्या भूमिका आहेत.