|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » leadingnews » UPDATES : मुंबईत शिवसेनेने ‘औकात’ दाखवलीच

UPDATES : मुंबईत शिवसेनेने ‘औकात’ दाखवलीच 

ऑनलाईन टीम/ मुंबई :

  मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेपुढे कडवे आव्हान उभे करणाऱया भाजपाला धनुष्यबाणाने मतमोजणीत आपली औकात दाखवून दिली. मुंबईत सेना ८४ जागांवर विजय मिळवला आहे तर भाजपने ८२ जगणावर विजय मिळवला आहे . 

मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत. दादरसह मुंबईच्या विविध भागांत सेनेने जोरदार आघाडी घेतली आहे. तर भाजपानेही चांगली कामगिरी केल्याचे दिसत आहे. भाजपा 38, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 09, तर इतर 14  जागा, अशी अनुक्रमाने आहे 

 

ठाण्यातही शिवसेनेचाच बाणा

ठाण्यातही शिवसेनेने मुसंडी मारली असून, तब्बल 42 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपा 17, राष्ट्रवादी 16  मनसे 3 , व इतर 4 अशी अन्य पक्षांची आघाडी दिसत आहे.

नाशकात कमळ

नाशिक महापालिकेत भाजपाने जोरदार आघाडी घेतल्याचे दिसत आहे. तेथे पक्ष  67जागांवर बहुमत मिळवले . सेना 34, काँग्रेस06  राष्ट्रवादी 05 , मनसे 05, इतर 05  अशी अनुक्रमे आघाडी दिसत आहे.

पिंपरीत राष्ट्रवादीची आघाडी

पिंपरीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कांटे कि टक्कर पाहायला मिळत आहे.  आघाडी घेतली आहे. तेथे एकूण जागा 128 असून, भाजपा 30, सेना 04, काँग्रेस 0, राष्ट्रवादी 22, मनसे 01 अशी अनुक्रमे आघाडी दिसत आहे.

उल्हासनगरमध्ये काटय़ाची टक्कर

उल्हासनगरमध्ये भाजपा 33  राष्ट्रवादी 04 , सेना21   अशी अनुक्रमे आघाडी दिसत आहे.

पुण्यात भाजपाची मुसंडी

पुणे महापालिकेत भाजपाने मुसंडी मारली असून, तब्बल 77  जागांवर आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी 44 जागांवर  आहे.

सोलापूर, नागपूर, अमरावती, अकोल्यामध्येही भाजपा आघाडीवर

सोलापुर अकोला आणि उल्हासनगरमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे