|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडय़ात 28 रोजी कार्निव्हल चित्ररथ स्पर्धा

फोंडय़ात 28 रोजी कार्निव्हल चित्ररथ स्पर्धा 

प्रतिनिधी /फोंडा :

फोंडा नागरपालिकेतर्फे कार्निव्हाल 25 फेब्रु. ते 28 फेब्रु दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. 28 रोजी भवानी सदन ते आगियार मैदान पर्यत भव्य चित्ररथ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी दामोदर मोरजकर बावटा दाखवून प्रारंभ करणार आहेत. अशी माहिती पालीकेचे मुख्याधिकारी तथा कार्निव्हल समितीचे अध्यक्ष नवनाथ नाईक यांनी दिली. पालीका सभागृहात ही  पत्रकार परिषदेत घेण्यात आली.

 यावेळी समितीचे उपाध्यक्ष आशिक खान, संयोजक सचिव अरूण नाईक उपस्थित होते. कार्निव्हल सोहळय़ाच्या शुभारंभी शनिवार 25 रोजी सायं. 7.30 वा. तिस्क फोंडा आगियार मैदान येथे कॉमेडीयन डॉमनिक व लुईस बचन यांच्या ‘माफी मागता’ या तियात्राचा प्रयोग होईल. रविवार 26 रोजी सायं. डॉ. सुवारीस यांची संगीत मैफील  व मनोहर भिंगी याचा हास्यकार्यक्रम होईल. सोमवार 27 रोजी सायं. आगोस्तुनो यांचा तियात्राचा प्रयोग होईल. मंगळवार 28 रोजी सायं 3.30 वा. चित्ररथ स्पर्धा होईल. स्पर्धेला प्रारंभ भवानी सदन ते तिस्क आगियार मैदान येथे स्पर्धेंची सांगता होईल चित्ररथ स्पर्धेतील विजेत्या पथकाला पारंपारिक गटाला प्रथम पारितोषिक  रू. 75 हजार, द्वितीय रू.60 हजार, तृतीय रू.45 हजार, चौथे रू.30 हजार, पाचवे रू.15 हजार तसेच  रू. 5 हजारांची पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. संस्थेतील गटाला प्रथम रू. 50 हजार, द्वितीय रू.40 हजार, तृतीय रू.30 हजार, चौथे रू.20 हजार, पाचवे रू.12 हजार तसेच  रू. 4 हजारांची पाच उत्तेजनार्थ  फन जंन्क गटाला प्रथम रू. 20 हजार, द्वितीय रू.18 हजार, तृतीय रू.10 हजार, चौथे रू.8 हजार, पाचवे रू.5 हजार तसेच  रू. 1 हजार पाचशेची पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. कौठुबिक गटाला  रू. 20 हजार, द्वितीय रू.18 हजार, तृतीय रू.10 हजार, चौथे रू.8 हजार, पाचवे रू.5 हजार तसेच रू. 1 हजार पाचशेची पाच उत्तेजनार्थ गर्दीतील जोकर गटाला प्रथम  रू. 12 हजार, द्वितीय रू.9 हजार, तृतीय रू.7 हजार, चौथे रू.5 हजार, पाचवे रू.3 हजार तसेच रू. 1 हजारांची पाच उत्तेजनार्थ एकूण रू.6 लाखची रोख पारितोषिके देण्यात येतील.