|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Automobiles » नवी Jaguar XF लाँच

नवी Jaguar XF लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

Jaguar LandRover इंडियाने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी Jaguar XF भारतामध्ये नुकतीच लाँच केली आहे. या नव्या लक्झरी कारमध्ये अत्याधुनिक असे फिचर्स देण्यात आले आहेत. ही नवी कार ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास कंपनीला आहे.

असे असतील या कारचे फिचर्स –

– इंजिन – पेट्रोल वेरियंट असणाऱया या कारमध्ये 2.0 लिटरचे 4 सिलिंडर टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आले असून या इंजिनमध्ये 237 बीएचपी पॉवर आणि 340 एनएमचा टार्क जनरेट करण्याची क्षमता असणार आहे.

– गिअरबॉक्स – 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स

jaguar

– इंजिन – डिझेल इंजिन असणाऱया या मॉडेलमध्ये 2.0 लिटरचे 4 सिलिंडर टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आले आहे. यामाध्यमातून 177 बीएचपीची पॉवर आणि 430 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता या कारमध्ये असणार आहे.

– किंमत – 47.50 लाखांपासून ते 60.5 लाखांपर्यंत (दिल्ली – एक्स शोरुम)