|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संज्योत बांदेकर, मधुश्री पुजारी यांचे महापौरांकडे अर्ज सादर

संज्योत बांदेकर, मधुश्री पुजारी यांचे महापौरांकडे अर्ज सादर 

प्रतिनिधी/बेळगाव

     महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी अर्ज देण्याचे आवाहन बेळगाव विकास आघाडीच्यावतीने केले होते. गेल्या दोन दिवसात कोणीही अर्ज सादर केला नव्हता. मात्र महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नगरसेविका संज्योत बांदेकर आणि मधुश्री पुजारी यांनी महापौर सरिता पाटील यांच्याकडे शुक्रवारी महापौरपदासाठी अर्ज दिले. पण उपमहापौरपदासाठी अद्याप एकही अर्ज आलेला नाही.

   बेळगाव विकास आघाडीमधून मराठी भाषिक महापौर निवडण्याचा निर्णय घेण्यात आला असून याकरिता 32 नगरसेवकांमधून इच्छुक असलेल्यांनी महापौर सरिता पाटील यांच्याकडे अर्ज देण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन दिवसात कोणीच अर्ज दिला नाही. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर अर्ज देण्यात आले आहेत. महापौरपदासाठी मधुश्री पुजारी आणि संज्योत बांदेकर, मीनाक्षी चिगरे इच्छुक असल्याची चर्चा होती. पण यापैकी मीनाक्षी चिगरे यांनी समविचारी गटाकडे अर्ज दिला आहे. त्यामुळे बेळगाव विकास आघाडीकडे अर्ज दिला नाही. मात्र शुक्रवारी मधुश्री पुजारी आणि संज्योत बांदेकर यांनी महापौरपदासाठी अर्ज दिला आहे. उपमहापौरपदासाठी मोहन बेळगुंदकर, राकेश पलंगे, मोहन भांदुर्गे, संजय शिंदे आणि नागेश मंडोळकर आदी इच्छुक असल्याची चर्चा आहे. पण अद्याप अर्ज देण्यात आलेले नाहीत. मात्र नागेश मंडोळकर यांनी समविचारी आघाडीकडे अर्ज दिला आहे. यामुळे उपमहापौरपदासाठी कितीजण अर्ज करणार याकडे लक्ष लागले आहे.

Related posts: