|Monday, July 16, 2018
You are here: Home » Top News » भाजपच्या यशाच्या फुग्यात तेवढी हवा आहे का? – उध्दव ठाकरे

भाजपच्या यशाच्या फुग्यात तेवढी हवा आहे का? – उध्दव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या लागलेल्या निकालात भाजपला मोठे यश मिळाले असले तरी शिवसेने भाजपाच्या यशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा झालेला विजय हा मान्य आहे. पण या यशाचा फुगा जेवढा फुगवला जात आहे तेवढी हवा त्यात आहे का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी, ‘सामना’च्या अग्रलेखातुन विचारला आहे.

भाजपचा ‘टक्का’वाढला हे जरी खरे असले तरी ‘टोमणे’ही बऱयापैकी बसले आहेत, असा टोलाही उध्दव यांनी लागवला आहे. ‘विजयाचा आनंद साजरा करण्यात काही गैर नाही मात्र त्या पक्षाने हा जो ‘आकडा’गाठला तो केंद्र आणि राज्यात सत्तेचा ‘मटका’ त्यांच्याकडे असल्याने, हे मग मान्य व्हायला काहीच हरकत नसावी’अशी टीका उद्धव यांनी केली.

Related posts: