|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » जयललिता यांच्या भाचीचा नवा पक्ष

जयललिता यांच्या भाचीचा नवा पक्ष 

ऑनलाईन टीम / तामिळनाडू :

तामिळनाडूच्या दिवगंत मुख्यमंत्री जयललिता यांच्या भाची दीपा जयकुमार यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. एमजीआर आम्मा दीपा पैरवे असे या नव्या पक्षाचे नाव असणार आहे.

जयललिता यांच्या निधनानंतर मोकळय़ा झालेल्या आर. के. नगर विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, ही जनतेची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आण्णा द्रमुकच्या नेत्या असलेल्या जयललिता यांच्या निधनानंतर राज्यात राजकीय संघर्ष उफाळला आहे. जयललिता यांच्या दीर्घकाळ सहकारी शशिकला यांनी पक्षावर ताबा मिळवला आहे. त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी बंड पुकारले असून दीपा यांनी त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे.