|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » जे 15 वर्षात जमले नाही ते 15 महिन्यांत करुन दाखवू : पंतप्रधान

जे 15 वर्षात जमले नाही ते 15 महिन्यांत करुन दाखवू : पंतप्रधान 

ऑनलाईन टीम / इंफाळ :

मुख्यमंत्री ओ. इबोबी सिंह यांच्या नेत्तृत्त्वाखालील काँग्रेस सरकारने राज्यात मागील 15 वर्षांमध्ये जे काही केले नाही ते आमचे सरकार सत्तेत आल्यावर 15 महिन्यांत करुन दाखवू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला दिले.

इंफाळ येथील एका रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले, मागील 15 वर्षांपासून मणिपूर राज्यातील काँग्रेस सरकारला जनतेकडून विरोध होत होता. त्यानंतर पक्षाने राज्य सरकारमधील आपले अधिकार गमावले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांसाठी मणिपूरच्या जनतेची सेवा करण्याची संधी भारतीय जनता पक्षाला द्या. आमची सत्ता आल्यास मागील 15 वर्षांपासून राज्यात जे काही केले नाही ते 15 महिन्यांत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.