|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बोअरवेलची गाडी उलटून चालक जागीच ठार ; सहाजण जखमी

बोअरवेलची गाडी उलटून चालक जागीच ठार ; सहाजण जखमी 

दापोली-वणौशीतील अपघात

चालकाचा गाडीवरील सुटला ताबा

 

वार्ताहर /पालगड

दापोली तालुक्यातील वणौशी येथे दापोलीहून लाटवणला जाणारी बोअरवेल गाडी उलटून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला तर अन्य सहाजण जखमी झाले आहेत. ही गाडी वणौशीजवळ वळणावर आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाहेर जावून उलटली.

या अपघातात चालक पल्लीस्वामी (50 रा. तामिळनाडू) हे जागीच ठार झाले. तर प्रकाश पिगिवडे, सुरेश वडखडे, दिलीप मसराम, राम भलोपे, रोहित परते, राजकुमार जायीया हे जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना वणौशी व पालगड येथील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत मदतीचा हात देवून त्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना दापोली येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघात प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम रहाटे व पोलीस नाईक संदेश गुजर करीत आहेत.

Related posts: