|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी 150 जादा एसटी बसेस सज्ज

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी 150 जादा एसटी बसेस सज्ज 

कणकवली : मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रोत्सवात प्रवाशांच्या सोयीसाठी जादा एस. टी. गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. 150 गाडय़ांचा ताफा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती रा. प. सिंधुदुर्गच्या विभाग नियंत्रकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

कणकवली, मालवण, कुडाळ या तालुक्यातील परिसरातून मोठय़ा प्रमाणात जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. तर सावंतवाडी, वेंगुर्ले, देवगड, विजयदुर्ग या आगारांच्या कार्यक्षेत्रातील परिसरातूनही प्रवासी उपलब्धतेनुसार जादा गाडय़ा सोडण्यात येतील. जादा गाडय़ा 1 मार्चला पहाटेपासून सुरू होणार असून 3 मार्चपर्यंत दिवसरात्र वाहतूक सुरू राहील. प्रवाशांचा ओघ लक्षात घेऊन 1 मार्चला जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. कणकवली, मालवण, कुडाळ येथील यात्रास्थानांवरून पहाटे पाच वाजल्यापासून गाडय़ा सोडण्यात येतील. आंगणेवाडी येथे भाविक प्रवाशांसाठी प्रवासी शेड उभारण्यात आल्या असून बसमध्ये सुलभ प्रवेश मिळविण्याच्यादृष्टीने ‘क्यू रेलिंग’ची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. 2 व 3 मार्चला कणकवली रेल्वेस्थानक येथून मालवण व आंगणेवाडी परिसरात जाणाऱया प्रवाशांसाठी जादा गाडय़ा सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली आहे.