|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बाह्यगोष्टींच्या अभ्यासाने अधिक सशक्त अभिनय शक्य

बाह्यगोष्टींच्या अभ्यासाने अधिक सशक्त अभिनय शक्य 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  बाह्यगोष्टींचा अभिनयाशी जवळचा संबंध असतो. त्यामुळेच कलाकाराला रोजच्या जीवनात भाषा, वर्तनशैली, स्व, कपडे, मानसिक अवस्था, देहबोली, संस्कार या सर्व गोष्टींचा अभ्यास आणि निरिक्षण करावे लागते. या माध्यमातून कलाकाराचा अभियन अधिक उठावदार होऊ शकतो. पर्यायाने कलाकार आपल्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकतो, असे मत अभिनेते हृषिकेश जोशी यांनी व्यक्त केले. प्रत्यय नाटय़महोत्सवातंर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

   संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात गुरुवारपासून प्रत्यय नाटय़ महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवांतर्गत शनिवारी सायंकाळी रंगसंवाद या कार्यक्रमात ‘नाटक आणि अभिनय : बाह्यरंग’ या विषयावर हृषिकेश जोशी यांनी कलाकार प्रकाश फडणीस आणि नवोदित कलाकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विविध चित्रपटांत भूमिका साकारताना वेगवेगळया ‘आयडिया’ शोधल्या. संवादफेकीप्रमाणे नजरफेकीचाही अभ्यास करता आला. सिनेमातील माझे पात्र कसे असावे, हे मीच ठरवले. पात्र रंगवताना मी आतून कसा आहे. यापेक्षा मी कसा दिसणार आहे. या गोष्टीवर भर दिला. अर्थात, हे सारे करत असताना कमीत कमी गोष्टीत अधिकाधिक परिणामकारी भूमिका करण्याचा कसोशिने प्रयत्न केला.

  ते म्हणाले, यापूर्वी मी गरीबीमुळे पिचलेला, सोशीक अशा स्वरूपाच्या भूमिका वठवल्या होत्या. चिटर या चित्रपटात मला हिरे व्यापाऱयांची भूमिका साकारायची होती. यासाठी त्या भूमिकेला अनुसरून जीवनशैलीच्या अनुषंगाने काही गोष्टींचा नव्याने अभ्यास करावा लागला. एका भूमिकेत वेगवेगळया पद्धतीचा विचार करणे आवश्यक ठरते. मराठी सिनेमात जेवण्याच्या भिन्नभिन्न पध्दती आहेत. यावरून तेथील संस्कार समजतात. युरोपीयन कलाकार हे वर्तनशैली चांगलीच जोखतात. त्याचप्रमाणे आपल्याकडेही अशा पध्दतीची वर्तनशैली कलाकारांनी जोखायला हवीय. लवकरच आपला सायकल हा मराठी सिनेमा प्रदर्शित होणार आहे, असेही त्यांनी यावेळी नमुद केले. दरम्यान, या महोत्सवातंर्गत आज 26 रोजी रात्री दहा वाजता व्हाईट रॅबीट रेड रॅबीट हे नाटक सादर करण्यात येणार आहे.

   मै राही मासूम

   हैदराबाद येथील सूत्रधार या संस्थेतर्फे शनिवारी रात्री ‘मै राही मासूम’ हे हिंदी नाटक सादर करण्यात आले. डॉ. मासूम रझा, हिंदी व ऊर्दू साहित्य लेखनातील एक महत्वाचे नाव. अभिनव कदम नावाच्या हिंदी मासिकातून प्रसिद्ध झालेल्या डॉ. मासूम रझा यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱया विशेषांकातून सूत्रधार, हैदराबाद यांनी हे नाटक रूपांतर केले आहे. डॉ. रझा यांनी द्वेषाचे व तिरस्काराचे राजकारण करणाऱया लोकांना आपल्या लिखाणातून नेहमीच विरोध केला. सूत्रधार, हैदराबाद या संस्थेचे भास्कर शेवलकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे व विनय वर्मा यांनी, मुख्य भूमिका केली आहे. डॉ. रझा यांच्या आयुष्यावर आधारित हा प्रयोग होता.

 

Related posts: