|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मटका बुकी बबन कवाळे टोळीवर हद्दपारीची कारवाई

मटका बुकी बबन कवाळे टोळीवर हद्दपारीची कारवाई 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 गेल्या अनेक वर्षापासून शहरात अवैध मटका व्यवसाय चालवणाऱया राजारामपुरीतील बबन कवाळे टोळीवर पोलीसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. एक वर्षासाठी या टोळीला हद्दपार करण्यात आले आहे.

बबन लाला कवाळे (वय 44 रा . मातंग वसाहत )अवैध मटका व्यावसायिक टोळीप्रमुख, मोहन मधुकर दाभाडे टोळीचा सदस्य, स्वप्नील बाळासो कवाळे टोळीचा सदस्य  यांच्याविरुध्द पोलीस निरीक्षक  अमृत देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम  1951 चे कलम 55 अन्वये  कारवाई करुन पोलीस अधीक्षक महादेव तांबडे यांच्याकडे हद्दपार करण्यासाठी अहवाल सादर केला होता.पोलीस अधीक्षक तांबडे यांनी चौकशी करुन या तिघांना एक वर्षासाठी कोल्हापूर शहर व जिल्हय़ातून हद्दपार करण्याचे  आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. बबन कवाळे याच्यावर कल्याण व मुंबई मटक्याचे 55 गुन्हे दाखल आहेत.मोहन दाभाडे याच्यावर 15 गुन्हे दाखल आहेत.तर स्वप्नील कवाळे याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत.