|Monday, May 27, 2019
You are here: Home » Top News » पेपरफुटीमुळे सैन्यभरतीची परीक्षा अखेर रद्द

पेपरफुटीमुळे सैन्यभरतीची परीक्षा अखेर रद्द 

ऑनलाईन टीम / ठाणे :

सैन्यभरतीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याने देशभरात आज झालेल्या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील परीक्षेबाबत लवकरच माहिती दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

leak

देशभरात होणाऱया सैन्यभरतीचा पेपर व्हॉटस्अप तसेच अन्य माध्यामातून फुटल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये ठाणे, नागपूर, पुण्यासह ठिकठिकाणी छापेमारी करत शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई ठाणे क्राईम ब्रांचने केली आहे. आत्तापर्यंत 18 जण अटकेत आहेत. तसेच पुण्यातील हडपसर भागातून धनाजी जाधव आणि संतोष शिंदे या दोघांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. या सर्वांनी सैन्यभरतीचा पेपर 70 जणांना 3 लाखांत दिला असल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, या पेपरफुटीप्रकरणात लष्करातील अनेक बडे अधिकाऱयांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानुसार ठाणे गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे.

Related posts: