|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » Top News » राज्यात सर्वत्र काँग्रेससोबत आघाडी : शरद पवार

राज्यात सर्वत्र काँग्रेससोबत आघाडी : शरद पवार 

ऑनलाईन टीम / नांदेड :

राज्यातील सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेससोबत आघाडी करु, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाली आहे.

जर राज्यात काँग्रेससोबत आघाडी झाल्यास राज्यातील 17 ते 18 जिल्हा परिषदांमध्ये सत्ता येईल. मुंबईत होणाऱया राष्ट्रवादीच्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो, असे पवार म्हणाले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवडणुकांनंतरचे वर्तन पाहता ते सत्तेतून बाहेर पडतील, असे वाटत नाही. पण बाहेर पडले तर मध्यावधी निवडणुकांना जाण्यासाठी सज्ज आहोत, असेही पवार म्हणाले.

Related posts: