|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » सरस्वती मालिकेमध्ये कलाकारांची दुबईची वारी

सरस्वती मालिकेमध्ये कलाकारांची दुबईची वारी 

कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये आजवर सरस्वतीच्या आयुष्यात बऱयाच घटना घडल्या काही वाईट काही चांगल्या. प्रेक्षकांची खास पसंती नेहमीच या मालिकेला मिळत आलेली आहे. सरस्वतीने आजवर अनेक अडचणींना खंबीरपणे उत्तर दिले, आपल्या माणसांच्या पाठीशी ती नेहेमीच उभी राहिली आहे, मोठे मालक म्हणजेच राघवच्या मनात देखील सरुने अबाधित स्थान निर्माण केले. तिने घरात तिची महत्वपूर्ण जागा निर्माण केली. पण सध्या वाडय़ात अनेक गोष्टी घडत आहेत, ज्या सरस्वतीला देखील थोडय़ा आश्चर्यकारक वाटत आहेत. वाडय़ामध्ये अनेक वेगवेगळे चेहरे आले आहेत ते कोण आहेत? त्यांचा हेतू काय आहे? सरस्वतीच्या जीवाला धोका तर नाही ना? यामधून सरस्वती कसा मार्ग काढणार? असे अनेक प्रश्न सरस्वतीच्या आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणार यात वाद नाही. पण या सगळ्या प्रश्नांचा उलघडा लवकरच प्रेक्षकांसमोर होणार आहे हे नक्की.

नुकताच वाडय़ामध्ये रखमा आणि राधाची एन्ट्री झाली आहे. त्यांचे हेतू काही बरे नाहीत अशी शंका सरुच्या मनात आली आहे. ही रखमा आणि राधा नक्की कुठल्या हेतूने वाडय़ामध्ये आले आहेत? त्यात सरुच्या जीवाला धोका आहे, सदानंद काळे नावाचा शूटर सरस्वतीला मारण्यासाठी वाडय़ामध्ये आला आहे. रखमाचे पात्र उषा नाईक तर राधा ऋतुजा धर्माधिकारी वठवणार आहे. सदानंद काळेची भूमिका मयूर खांडगे निभवणार आहे. या सगळय़ा घडामोडी आणि गोंधळामध्ये सरस्वती आणि राघव लवकरच दुबईची वारी करणार आहेत. सरू आणि राघव पहिल्यांदाच एकत्र बाहेर गावी जाणार असून त्यांच्यासाठी हि ट्रीप खूप महत्वाची असणार आहे. बऱयाच कालावधीनंतर सरू आणि राघवच्या आयुष्यात हे क्षण आणि आनंद आला आहे, त्यांना इतका वेळ एकत्र मिळणार आहे. पण त्यांची हि दुबई ट्रीप सुखरूप होईल? सरुला मारण्याच्या हेतूमध्ये सदानंदला यश मिळेल ? कि खरोखरच सरस्वतीचा मफत्यू होईल ? राघव आणि सरू एकमेकांपासून दुरावले तर जाणार नाही ना ? हे सगळ बघण रंजक ठरणार आहे. या सगळय़ा घडामोडी कलर्स मराठीवर सोम ते शनि संध्या. 7.00 वाजता सरस्वती मालिकेत पाहयला मिळणार आहेत.

Related posts: