|Monday, June 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दिल्लीत वॉशिंग मशीनमध्ये पडून जुळ्या मुलांचा मृत्यू

दिल्लीत वॉशिंग मशीनमध्ये पडून जुळ्या मुलांचा मृत्यू 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

नवी दिल्लीच्या रोहिणी भागात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरात ठेवलेल्या वॉशिंग मशीनच्या टँकमध्ये बुडाल्याने 3 वर्षांच्या दोन जुळ्या भावांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी जेव्हा ही घटना घडली तेव्हा या मुलांची आई वॉशिंग पावडर आणण्यासाठी घराजवळील दुकानावर गेली होती. याचदरम्यान दोन्ही निष्पाप मुले स्नानगृहात मशीनजवळ ठेवलेल्या कपडय़ांवर चढून पाण्याने भरलेल्या टँकमध्ये डोकावत असताना त्यात कोसळले.

रविंद्र सिंग हे रोहिणी येथील वसाहतीत पत्नी आणि तीन मुलांसह राहत होते. मोठा मुलगा 10 वर्षांचा आहे. रविंद्र हे शनिवारी सकाळी कामासाठी घरातून बाहेर पडले तर मोठा मुलगा शाळेत गेला. तर पत्नीने दोन्ही मुलांना आंघोळ घातल्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये पाणी भरून जवळच्या दुकानात खरेदीसाठी गेली. काही वेळानंतर जेव्हा त्या परतल्या, तेव्हा त्यांना दोन्ही मुले दिसली नाहीत. जवळपास शोध घेतल्यानंतर देखील ते सापडले नाहीत. तेव्हा तिने पतीला याची माहिती दिली. याचदरम्यान शेजाऱयाने पोलिसांना याची कल्पना दिली. पोलिसांनी पीडितेच्या घरी धाव घेत पाहणी केली. यावेळी स्नानगृहातील वॉशिंगमशीनमध्ये पाहिले असता त्यांना धक्काच बसला. दोन्ही मुले तोंडावर वॉशिंगमशीनमध्ये पडली होती. टँकमध्ये तेव्हा जवळपास 15 लीटर पाणी होते.