|Thursday, December 13, 2018
You are here: Home » क्रिडा » द्रोणावली हरिकाला कांस्यपदक

द्रोणावली हरिकाला कांस्यपदक 

उपांत्य फेरीत पराभव, झाँगयी-ऍना अंतिम लढत

वृत्तसंस्था/ तेहरान

भारताची ग्रँडमास्टर दोणावली हरिकाला महिलांच्या फिडे विश्व बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा. चीनच्या झाँगयीकडून टायब्रेकरमध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील तिचे हे सलग तिसरे कांस्यपदक आहे.

अतिशय चुरशीने झालेल्या टायब्रेकरमध्ये हरिकाने अनेक संधी गमविल्याने तिला पराभव स्वीकारावा लागला. झाँगयीची जेतेपदाची लढत युक्रेनच्या ऍना म्युझीचुकशी होईल. झाँगयीला अंतिम लढतीत काळय़ा मोहरा मिळणार असून तिला चार मिनिटांचा तर पांढऱया मोहरांना पाच मिनिटांचा अवधी मिळेल आणि 61 व्या चालीपासून प्रत्येक चालीनंतर 2 सेकंद जादा मिळणार आहेत. अंतिम फेरीत एकूण सहा डाव होणार आहेत. म्युझीचुकने रशियाच्या अलेक्झांड्रा कोस्टेनियुकचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे.

हरिका व झाँगयी यांनी वेगवान खेळ केला आणि हरिकाने वजीर-प्याद्याने डावाचा शेवट केला तेव्हा तिच्याकडे एक मोहरा जादा होती. जादा प्यादे असणे बऱयाचदा फारसे उपयोगाचे नसते. पण हरिकाने वजिराची मारामारी करण्याच्या दोन सुवर्णसंधी दवडल्या. त्या साधल्या असता तिला सहज विजय मिळाला असता. त्याऐवजी तिने वजिराच्या आधारे बराचवेळ खेळ केला आणि 99 व्या चालीत अखेर तिला पराभव स्वीकारावा लागला.

त्याआधी हरिकाने टायब्रेकरमधील पहिला डाव जिंकून शानदार सुरुवात केली होती. हा डाव तिने केवळ 17 चालीत जिंकला होता. दुसरा डाव अनिर्णीत राखून अंतिम फेरी गाठण्याची तिला संधीही मिळाली होती. पण नशिबाची तिला साथ मिळाली नाही आणि तिच्याकडून एक चूक झाल्याने पराभव स्वीकारावा लागला. यात बरोबरी झाल्याने दुसऱयांदा टायब्रेकर लढत घ्यावी लागली. यामध्ये हरिकाला काळय़ा मोहरांनी खेळताना पहिला डाव गमवावा लागला. पण परतीच्या डावात सुदैवाने तिला विजय मिळाला आणि पुन्हा दोघींत बरोबरी झाली. यानंतर 5 मिनिटांचे दोन ब्लिट्झ डाव घेण्यात आले. पण यातही बरोबरी झाल्याने शेवटी आर्मागेडॉन डाव घेण्यात आला आणि त्यात झाँगयीने बाजी मारत अंतिम फेरी निश्चित केली. झाँगयीने पूर्ण लढत 5-4 अशा फरकाने जिंकली.

हरिकाला तिसऱयांदा या स्पर्धेत कांस्यपदक मिळाले आहे. यापूर्वी 2012 मध्ये हरिकाला उपांत्य फेरीत बल्गेरियाच्या अँटोनेटा स्टेफानोव्हकडून तर 2015 मध्ये युक्रेनच्या मारिया म्युझीचुककडून पराभव स्वीकारावा लागला होता.

Related posts: