|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पेंडाखळे सरपंचपदी सौ. सुनिता पाटील

पेंडाखळे सरपंचपदी सौ. सुनिता पाटील 

वार्ताहर / पाटपन्हाळा

पेंडाखळे (ता. शाहूवाडी) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. शुनिता युवराज पाटील यांची निवड करण्यात आली. ऱी निवड बिनविरोध होणार असे वाटत असताना अंतिम क्षणी मतदान प्रक्रिया होऊन सात विरुद्ध दोन मतांनी निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी सुधाकर गावित यांनी काम पाहिलें.

 पेंडाखळे, गौळवाडा, सुतारवाडी यांचा समावेश समावेश असलेल्या या ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सव्वा वर्षापूर्वी बिनविरोध पार पाडली होती. त्यावेळच्या समझोत्यानुसार सव्वा वर्षासाठी सरपंचपद गौळवाडा येथे देण्याचे ठरले. त्यानुसार सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणाऱया सरपंचदाचा मान सौ. मानसी राऊत यांना मिळाला. कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर सौ. राऊत यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.  रिक्त झालेल्या पदासाठी माजी सरपंच युवराज पाटील यांच्या पत्नी सौ. सुनिता युवराज पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित होती. त्यानुसार सौ. सुनिता पाटील यांनी अर्ज दाखल केला. पण अनपेक्षितपणे रेक्ष्मा कांबळे यांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केला व त्यांना तो वेळेत माघार घेता आला नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर गावित यांना मतदान घ्यावे लागले.  हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात सुनिता पाटील यांच्या बाजूने स्वतः सह उपसरपंच दत्तात्रय पाटील, युवराज  लोहार, आनंदा डोंबे, उमा पाटील, मानसी राऊत व जयश्री वरंडेकर या सात जणांनी मतदान केले. तर रेक्ष्मा कांबळे यांच्या बाजूने स्वतः व त्यांचे पती सुरेश कांबळे यांचे मतदान झाले. यामुळे सुनिता पाटील यांची निवड निश्चित झाली.  यावेळी ग्रामसेविका शोभा पाटील, माजी सरपंच युवराज पाटील, श्रीपती राऊत, गजानन पाटील, योगेश पाटील उपस्थित होते.

 

 

  
 

 

Related posts: