|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याचा राहुल वर्मा विजेता

खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याचा राहुल वर्मा विजेता 

रत्नागिरी:

चेसमेन रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याच्या राहुल वर्मा या खेळाडूने 9 पैकी 8.5 गुणांची कमाई करत अपराजित राहून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. कोल्हापूरच्या निहाल मुल्ला व अनिष गांधी यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे स्थान मिळवले.

 सर्व यशस्वीतांना स्पर्धेनंतर गौरवण्यात आले. बक्षीस वितरण के. जी. एन. सरस्वती फाउंडेशनचे माधव हिर्लेकर यांच्याहस्ते करण्यात आले. ही स्पर्धा के.जी.एन. सरस्वती फाउंडेशन, कै. रामचंद्र सप्रे यांचे कुटुंबीय, गद्रे मरीन, आबासाहेब व गोपिकाबाई वैद्य ट्रस्ट, मॅजिक स्क्वेअर चेस अपॅडमी, अंबर हॉल, बँक ऑफ इंडिया, शशिकांत पटवर्धन, सुशील मुळ्ये यांनी प्रायोजित केली. या स्पर्धेला प्रमुख पंच म्हणून सांगलीच्या दीपक वायचळ, रत्नागिरीच्या विवेक सोहनी व मुंबईच्या विकास भावे यांनी काम पाहिले. 

 या स्पर्धेत राहुल वर्मा, निहाल मुल्ला, अनिष गांधी, श्रीराज भोसले, मंदार साने, अक्षय खेर, हेमंत मांढे, राहुल समनगडकर, अनिकेत रेडीज, प्रणव टंगसाळे,  शुभम गिम्हवणेकर, समीर परांजपे यांनी अनुक्रमे पहिले ते बारावे स्थान निश्चित केले. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून पूर्वा सप्रेने प्रथम व परिघा इंदुलकरने द्वितीय स्थान पटकावले. या स्पर्धेत दोन ज्येष्ठ खेळाडुंचीही निवड करण्यात आली. यामध्ये बी एन नाईक यांनी पहिले तर रमेश मोहिते यांनी दुसरे स्थान पटकावले.