|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘त्या’ नराधमांची कारागृहात कैद्यांनी केली धुलाई

‘त्या’ नराधमांची कारागृहात कैद्यांनी केली धुलाई 

प्रतिनिधी / बेळगाव

मुत्यानट्टी येथील डोंगरावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या चौघा नराधमांची हिंडलगा कारागृहात कैद्यांनी धुलाई केली आहे. शनिवारी ही घटना घडली असून सुरक्षेच्या कारणावरुन त्यांना स्वतंत्र बराकीत हलविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आपल्या मित्रासमवेत मुत्यानट्टी डोंगरावर फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. यासंबंधी 20 फेब्रुवारी रोजी त्रस्त मुलीने काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोक्सो कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संजू उर्फ बाबु सिध्दाप्पा दड्डी (वय 24), सुरेश उर्फ चाचा भरमाप्पा बेळगावी (वय 24), सुनील उर्फ यल्ल्या लगमाण्णा राजकट्टी उर्फ डुंमगोळ (वय 21, तिघेही रा. मुत्यानकट्टी), महेश बाळाप्पा शिवनगोळ (वय 23, रा. मणगुत्ती) या चौघा जणांना अटक करुन पुढील चौकशीसाठी चार दिवस पोलीस कोठडीत घेण्यात आले होते. शनिवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

न्यायालयाच्या आदेशावरुन त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. 9 मार्चपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या नराधमांना काकती पोलिसांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात सोडून आल्यानंतर कारागृह अधिकाऱयांनी त्यांना कच्च्या कैद्यांच्या विभागात हलविले होते. मात्र या चौघा जणांनी केलेल्या घृणास्पद कृत्यामुळे कैद्यांच्या मनातही चीड होती. ती चीड व्यक्त करीत कैद्यांनी त्यांची धुलाई केली. त्यानंतर या चौकडीचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने कारागृह अधिकाऱयांनी त्यांना स्वतंत्र बराकीत ठेवले असून शनिवारी सायंकाळची घटना लक्षात घेऊन रविवारी दिवसभर त्यांना कोठडीतून बाहेर पडू दिले नाही.

या संबंधी कारागृहाचे मुख्य अधिक्षक टी. पी. शेष यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होवू शकले नाहीत. मात्र उपलब्ध माहितीनुसार कैद्यांनी या चौकडीची धुलाई केली आहे. त्यामुळेच रविवारी दिवसभर या नराधमांना आपापल्या बराकीतच रहावे लागले. प्रत्येकांना स्वतंत्र बराकीत ठेवण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.A

Related posts: