|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आता रेल्वेत खाद्यपदार्थांचे मनमानी दर आकारणे होणार बंद

आता रेल्वेत खाद्यपदार्थांचे मनमानी दर आकारणे होणार बंद 

नवी दिल्ली

रेल्वेत प्रवास करताना विक्रेत्याकडून खाद्यपदार्थांच्या वस्तूंच्या दरात फसवणूक झाल्याचा अनुभव अनेकांना आलेला असतो. पदार्थांची योग्य किंमत माहित नसणे याचे मोठे कारण आहे. अशा स्थितीत आता प्रवाशांना जागरुक करण्याच्या हेतून सोमवारी आयआरसीटीसीने एका ट्विटद्वारे खाद्यसामग्रीच्या अधिकृत किंमतीची माहिती दिली आहे.

या ट्विटमध्ये एक लिटर पाण्याची किंमत 15 रुपये नमूद करण्यात आली आहे. याचबरोबर स्टँडर्ड व्हेज बेकफास्टची किंमत 30 रुपये तर नॉनव्हेज ब्रेकफास्टची किंमत 35 रुपये आहे. या किमती फक्त मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेंसाठीच आहेत असे आयआरसीटीसीने स्पष्ट केले. राजधानी, शताब्दी आणि दूरंतो समवेत इतर लक्झरी रेल्वेंमध्ये खाद्यसामग्रीची स्वतंत्र किंमत निर्धारित करण्यात आली आहे.

रेल्वेत शाकाहारी थाळीची किंमत 50 तर मांसाहारी जेवण 55 रुपयांमध्ये मिळेल. ज्यात 250 मिलिलिटर पाण्याची बाटली देखील सामील असेल. प्रवाशांना जागरुक करताना आयआरसीटीसीने विक्रेत्याकडून खाद्यपदार्थ घेतल्यानंतर त्याचे बिल मागण्याचे आवाहन केले आहे.

Related posts: