|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जल्लोषाला ‘मालकांची’ तर सत्काराला ‘बापूंची’ गैरहजेरी

जल्लोषाला ‘मालकांची’ तर सत्काराला ‘बापूंची’ गैरहजेरी 

संजय पवार / सोलापूर

तब्बल 42 वर्षानंतर सोलपूर महापालिकेवर संत्तातर घडलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीपासून भाजपाचा उधाळलेला वारू रोखण्यात विरोधी पक्षांना अपयश येत आहे. पण, महापालिका निवडणूकीच्या काळात भाजपच्या देशमुख मंत्रीव्दयातील मिटलेला अंतर्गत संघर्ष पेल्यातील वादळच ठरण्याची शक्यता आहे. कारण भाजपाच्या जल्लोष कार्यक्रमाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गैरहजेरी लावली, तर आज भाजपाच्यावतीने आयोजिक करण्यात आलेल्या नुतन नगरसेवकांच्या सत्कार समारंभास गैरहजेरी लावत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उटे भरून काढल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे.

सोलापूर महापालिकेच्या स्थापनेपासून पाच वर्षाचा कार्यकाळ सोडला तर तब्ब्बल 42 वर्षे सोलापूर महापालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. पण, गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीपासून शहरासह जिल्हय़ाच्या ग्रामीण भागातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. या बदलत्या राजकीय समिकरणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे. तर भाजपाचा उधळलेला  वारूची अद्यापही घोडदौड तशीच सुरू आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे संख्य संपूर्ण सोलापूरकरांना माहिती आहे. पण, महापालिकेच्या निवडणूकीत पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी परिवर्तनाची हाक दिली. निवडणूकीच्या काळात प्रचारादरम्यान, एका व्यासपीठावर खुर्चीला खुर्ची लावून बसले. भाजपामध्ये कोणताही अंतर्गत संघर्ष नाही. असे अनेकवेळा जाहीरपणे सांगितले. यासाठी त्यांनी काहीवेळा वृत्तपत्र आणि चॅनेलचाही आधार घेतला.

देशमुख मंत्रीव्दयांच्या या आवाहनास प्रतिसाद देत सोलापूरकर जनतेने पालिकेवरील काँग्रेसची 42 वर्षाची सत्ता उलथून लावत परिवर्तन घडवत भाजपाच्या हातात पालिकेच्या चाव्या दिल्या. याचा आनंद साजरा करण्यासाठी शुक्रवारी शहर भाजपाच्यावतीने ‘जल्लोष’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या कार्यक्रमाला आवर्जुन हजेरी लावली होती. कार्यकर्ते, नुतन नगरसेवकांच्यासमवेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्याबराब्sार फुगडी घालत जोरदार जल्लोषही साजरा केला. पण, कार्यकर्माला उणिव भासली ती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची. शिवाय त्यांना माननाऱया काही नगरसेवकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पण, त्यांनी जल्लोषात सहभाग न घेता केवळ हजेरी लावत बघ्याची भूमीका घेतली होती. याची चर्चाही राजकीय वर्तुळात जोरदार रंगली होती.

या जल्लोष कार्यक्रमानंतर भाजपच्या शहर शाखेच्यावतीने सोमवारी नुतन नगरसेवकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होत. या कार्यक्रमास पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, भाजपाचे निरिक्षक रघुनाथ कुलकर्णी, शहर अध्यक्ष प्रा. अशोक निबंर्गी यांच्यासह सर्वच नुतन पदाधिकारी सहभागी झाले होते. महापालिकेवर परिवर्तन हे आपले स्वप्न होते. हे आपले स्वप्न पुर्ण झाल्याचे समाधान त्यांनी प्रकर्षाने सांगितले. पण, या कार्यक्रमाला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची मात्र गैरहजेरी प्रकर्षाने जाणवली.

भाजपाच्या सत्कार समारंभानंतर मात्र जल्लोषाला मालकांची आणि सत्काराला बापूंची गैरहजेरी अशी  सोशल मिडीयासह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. काँग्रेसने महापालिका निवडणूकीच्या प्रचार काळात देशमुख मंत्रीव्दयातील अतंर्गत संघर्षामुळे शहराचा विकास खुंटेल असा आरोप करण्यात येत होता. हा आरोप खरा ठरू नये अशी अशाही सोशल मिडीयातून व्यक्त करण्यात येत होती.

Related posts: