|Saturday, October 20, 2018
You are here: Home » leadingnews » भाजपने युपीत मुस्लिम उमेदवार द्यायला हवे होते :मुक्तार अब्बास नक्वी

भाजपने युपीत मुस्लिम उमेदवार द्यायला हवे होते :मुक्तार अब्बास नक्वी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी पयत्नांची शिकस्त चालवली आहे. याचदरम्यान जात, धर्मावरील राजकारणाके पुन्हा एकदा वेग घेतल्याचे दिसत आहे. नुकताच केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी भाजपने यूपीत एकही मुस्लिम उमेदवाराश विधानसभेचे तिकिट नसल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही उडी घेतली असून यूपीत भाजपने मुस्लिमांना उमेदवारी दिली असती तर चांगले झाले असते, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजप समाजातील सर्व वर्गंना बरोबर घेऊन जाण्यावर विश्वास ठेवते. पक्ष सत्तेवर आल्यानंतर मुस्लिम समुदायाला याची भरपाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तिकिट वाटपाबाबत बोलायचे म्हटले तर मुस्लिमांना उमेदवारी दिली असती तर परिस्थिती चांगली राहिली असती. सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही यांच्या अडचणी दूर करू आणि त्यांना भरपाईही देऊ, असेही ते म्हणाले.

Related posts: