|Thursday, December 13, 2018
You are here: Home » उद्योग » देना बँकेकडून आरएफआयडी कार्डची सुविधा

देना बँकेकडून आरएफआयडी कार्डची सुविधा 

पुणे/ प्रतिनिधी : 

देना बँकेकडून ग्राहकांना तातडीची आणि वैयक्तिक सेवा पुरवता यावी, यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन (आरएफआयडी) कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कार्डचे अनावरण देना बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्वनी कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्डद्वारे तत्पर वैयक्तिक आणि विशेष सेवा सादर केली जाते. या वेळी बोलताना देना बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्वनी कुमार म्हणाले, ‘आरएफआयडी सक्षम बँक सेवांच्या कार्डद्वारे शाखा व्यवस्थापकाला बँकेच्या ग्राहकांच्या ओळखीसाठी मदत होणार आहे. ग्राहक आपल्या या कार्डद्वारे आपल्या सर्व माहितीसह बँकेत प्रवेश करेल, ही माहिती कर्मचाऱयांच्या डेस्कटॉपवर झळकेल. यामुळे बँकेच्या कर्मचाऱयांना अशा ग्राहकांना योग्य सेवा पुरवण्याची काळजी घेता येईल.

Related posts: