|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

शापीत योगाचे भयानक परिणाम

बुध. दि. 1 ते 7  मार्च 2017

मुक्मयाप्राण्यांना शापीत घराण्यातील दोष पटकन समजतात. काही घराण्यात कुत्री, मांजर, कबुतरे, गायी, म्हशी व तत्सम प्राणी अजिबात टिकत नाहीत, असे काहीजण म्हणत असतात. काही ना काही कारण घडून मृत्युमुखी पडतात अथवा अचानक कुठेतरी गायब होतात. यामागील हेच कारण आहे. काहीजण मुके प्राणी हौसेने बाळगतात, ज्यावेळी मालकावर जिवावरचे संकट येते. त्यावेळी हे प्राणी मालकाचे मरण आपल्यावर ओढवून घेतात हे आम्ही अनुभवलेले आहे. कुणी करणी केली असेल अथवा कुणा पापी लोकांची  वाईट नजर असेल तरीही मुक्या प्राण्यांना ते समजते. जर एखाद्या घरात मृत्युसम संकटे येणार असतील तर कुत्री अथवा मांजरी किंवा घुबड बेसुर आवाजात भयानकरित्या ओरडत असतात. त्यावेळी लोक त्या मुक्मया प्राण्यांना मारून हाकलण्याचा प्रयत्न करतात पण त्यामागील तत्व काय आहे. सोयीस्कररित्या विसरतात. अशावेळी आपण सावधानता बाळगली पाहिजे. एखादा माणूस साधा असतो कुणाच्या अध्यातमध्यात नसतो पण काही लोक त्याला  निष्कारण त्रास  द्यायचा प्रयत्न करतात  पण  दैवी शक्तीचे पाठबळ त्याला त्यातून वाचविते. त्याला स्वत:ला काही करावे लागत नाही. या जन्मात जे काही कराल ते याच जन्मी भोगून संपवावे लागते. मी श्रीमंत आहे, वाटेल ते करीन माझे कोण वाकडे करणार अशी अनेकांची भाषा असते, पण त्यांच्या डोळय़ांसमोरच निसर्ग त्यांना अद्दल घडवीत असल्याचे स्पष्ट दिसून येते. मुलेबाळे अपघातात जाणे, अचानक वीज कोसळून होत्याचे नव्हते होणे, लाखो रुपये घालूनही रोग बरे न होणे, शारीरिक व्यंगत्व येणे, मुलांना व्यसन लागणे, संसार बिघडणे, चांगल्या पगाराच्या  व उच्च अधिकार असलेल्या नोकऱया अचानक  सुटणे किंवा व्ही. आर. एस.ची पाळी येणे असे प्रकार घडतात. काही विशिष्ट नक्षत्रात जन्मलेल्यांचा आशीर्वाद जसा लाभतो, त्याच न्यायाने काही कडक नक्षत्रातील व्यक्तीचे  शापही बाधतात. पण निष्कारण एखाद्याला शाप दिल्यास ते बुमऱयांगसारखे उलटते. घराण्याची पापपुण्याई राहूवरून समजते. जे कराल ते भराल अथवा जसे वागाल तेच तुमच्या पदरी येईल. हा निसर्गाचा नियम आहे. हाती  अधिकार अथवा एखाद्याने कष्टाने काही केले. घर, गाडी वगैरे घेतले की, अशा लोकांच्या पोटात मत्सराग्नी पेटतो व ते  पोटदुखीने आजारी पडतात. नोकरीत एखाद्याविषयी कलुषित मन करून त्याची पगारवाढ रोखणे,  अथवा त्याला कामावरून काढून टाकणे ज्याच्या जिवावर आपली उपजिविका चालते, त्यालाच लुबाडणे अथवा त्याच्यावर करणीप्रयोग करणे, बनावट व फाटक्मया नोटा देऊन एखाद्याला फसविणे. अन्नधान्यातील भेसळ, आपल्या मुलाबाळांचे चांगले व्हावे म्हणून त्यांच्यावरून काही तरी उतारा मंत्रून अथवा ओवाळून ते लोकांना खाऊ घालणे, करणीबाधा करून एखाद्याला पोटात काहीतर खावू घालणे, त्याचे वाईट करणे, आधुनिकतेच्या नावावर माता पित्याचा व भुमीचा तसेच देवादिकांचा अपमान करणे, पाठीमागे  एखाद्याची निष्कारण निंदानालस्ती व टीका करणे, असे प्रकार सर्रास सुरू असतात. पण कोणताही  विचार तो  चांगला असेल अथवा वाईट त्याचे पडसाद ताबडतोब उमटतात. अंतर्मनात त्याची नोंद होते व ग्रहमान अनुकूल अथवा प्रतिकूल आले की त्याचे दृश्य परिणाम दिसू लागतात, लोक देवापुढे काय मागणे करतील हे साक्षात ब्रह्मदेवालाही कळणार नाही. अमुक शत्रुचे  वाईट होऊ दे त्याचे अथवा तिचे असे होवू देत, तसे होवू दे असे गाऱहाणे घालतात. मुलगा अथवा मुलगी अभ्यास करीत नसेल तर तो खडय़ातच जाणार अथवा भिकेला लागणार असे बडबडत असतात, जसे विचार तसा आचार व तसे परिणाम हा निसर्ग नियम आहे.

तिसरा भाग


मेष

राशिस्वामी उद्या पहाटे  लक्ष्मीयोगात येत आहे. शुक्रही उच्च आहे. त्यामुळे अडलेली आर्थिक कामे होऊ लागतील. पैशाचा ओघ सुरू होईल. प्रयत्न करूनही  न होणारी कामे आपोआप होतील. गुरुचे भ्रमण काही बाबतीत अनिष्ट फलदायक आहे. त्यासाठी मद्य व मांसाहार यापासून दूर रहा. अनैतिक कृत्यात गुंतू नका.


वृषभ

राशिस्वामी शुक्र लाभात उच्च अवस्थेत आहे. राजयोगासारखे  श्रीमंती फल देईल. मनातील अनेक इच्छा पूर्ण करू शकाल. सर्व कार्यात भरभरून यश देणारा योग आहे. गुरु दूषित असल्याने व्यसन आणि इतर अनैतिक कृत्यात गुंतू नका. अन्यथा दुष्परिणाम जाणवतील. आर्थिक बाबतीत अतिशय उत्तम काळ.


मिथुन

उद्या पहाटे येणारा लाभातील बलवान मंगळ घर, जागा, वाहन याबाबतीत मोठे यश देईल. वजनदार मित्र मंडळीच्यामुळे अशक्मय प्राय वाटणारी कामे होतील. दशमातील उच्च शुक्रामुळे नोकरी उद्योग व्यवसायात भरभराट जाणवेल. कोणतीही शुभ कामे यशस्वी होतील. मंगल कार्याच्या संधी येतील व त्या लाभदायक ठरतील.


कर्क

उद्या पहाटे दशमात येणारा मंगळ नोकरी उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम ठरणार आहे. बदली, बढती व स्थलांतराचे योग. गेलेली नोकरी परत मिळेल. वास्तु होण्याचे योग. भाग्यातील उच्च शुक्रामुळे कुटुंबात शुभ कार्ये घडतील. मुलाबाळांच्या उत्कर्षाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण. दैवी कृपेची उत्तम साथ लाभेल. वस्त्र प्रावरणांची खरेदी अथवा  भेटवस्तू मिळतील.


सिंह

भाग्यात येणाऱया प्रभावी मंगळामुळे स्वभावात कडकपणा निर्माण होईल. जे काम हाती घ्याल ते जिद्दीने पूर्ण कराल. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यास हरकत नाही. उच्च शुक्रामुळे मोठमोठय़ा धनलाभाच्या संधी येतील. कुटुंबात सुख समृद्धी, विमा, मृत्युपत्र अथवा तत्सम मार्गाने इस्टेट अथवा एखादा उद्योग मिळण्याची शक्मयता.


कन्या

अष्टमात येणारा मंगळ नको ते धाडस करू नका, असे सुचवित आहे. जागे संदर्भातील अडलेली सर्व कामे यशस्वी होतील. गडभ्रमंती, बेफाम वेग व जीवावरच्या कसरती यापासून दूर रहा. क्षुल्लक चूक देखील जीवावर बेतू शकेल. उच्च शुक्रामुळे वैवाहिक जीवनात शुभ घटना, भागिदारी व्यवसाय करणार असाल तर उत्तम योग. या काळात विवाह केल्यास भाग्य उजळेल.


तुळ

सप्तमात येणारा प्रभावी मंगळ खर्चाचे प्रमाण वाढवील. मनात नसतानाही कोणाच्या तरी हौसेसाठी बराच खर्च करावा लागेल. वैवाहिक जीवनात ताणतणाव राहिल. उच्च शुक्रामुळे मंत्र, तंत्र व गूढ विद्येत उत्तम यश मिळवाल. आरोग्य सुधारणा. मातुल पक्षाकडून काहीतरी लाभ होईल पण त्याचा दुरुपयोग करू नका. कोर्ट कचेरीपासून दूर रहा.


वृश्चिक

राशिस्वामी मंगळ प्रभावी आहे. जे काम कराल. त्यातून धनलाभ होतील. हाती घेतलेले कोणतेही काम यशस्वी करून दाखवाल. शत्रूपिडा कमी होईल. पंचमातील उच्च शुक्र हा मुलाबाळांचे कल्याण आणि परमेश्वर शक्तिचा प्रत्यय आणून देईल.  लॉटरी, शेअर, बाजार, मटका, विमा अथवा तत्सम् मार्गाने धनलाभ होतील. प्रेमप्रकरणात असाल तर त्याचे विवाहात रुपांतर होईल.


धनु

पंचमात येणारा मंगळ काही बाबतीत शुभ असला तरी क्रीडाक्षेत्र व इतर धाडसी कृत्यात मोठी दुर्घटना घडविल. त्यामुळे सावध राहणे आवश्यक. काही जणांना स्टंटबाजी जीवावर बेतेल. उच्च शुक्रामुळे राहत्या वास्तुत नवनवीन सुधारणा कराल. वास्तुत प्रसन्न होऊन सर्व कामे होऊ लागतील.


मकर

चतुर्थातील मंगळामुळे जागेचे कोणतेही व्यवहार यशस्वी होतील. पण कौटुंबिक ताणतणाव वाढतील. अग्नि आणि विजेशी संबंधित कोणतीही कामे जपून करा. उच्च शुक्रामुळे मंगल कार्यासाठी प्रवास घडतील. शेजारी व नातेवाईकासह, आजूबाजूच्या व्यक्तिशी संबंध चांगले राहतील. काहीजण ऐन संकटाच्यावेळी देवासारखे धावून येतील. त्यामुळे माणुसकीची खरी ओळख पटेल.


कुंभ

प्रभावी मंगळ अनेक कामात मोठे यश देईल. कष्ट व धाडसाला लक्ष्मीची साथ मिळेल. मानसिक मरगळ दूर होऊन उत्साहाने सर्व कामे यशस्वी होतील. कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी व नव्या पाहुण्याचे आगमन, धनस्थ उच्च शुक्रामुळे आर्थिक भरभराट, मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. डोळय़ांचे विकार असतील तर ते कमी होतील. मानसिक संभ्रम दूर होईल.


मीन

उच्च शुक्रामुळे आरोग्य सुधारेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरावर चांगला प्रभाव पडेल. विवाह कार्यात अनेकांचे सहकार्य मानसिक समाधान देणाऱया घटना घडतील. मंगळ प्रभावी आहे. त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. अति उष्णता व पित्ताचा त्रास होईल. गॅस, अग्नि, वीज व तत्सम वस्तू जपून हाताळा. क्षुल्लक चूकदेखील महागात पडू शकेल.