|Saturday, July 20, 2019
You are here: Home » उद्योग » आयडीएफसी करणार रेशन दुकानांचे बँकेत रुपांतर

आयडीएफसी करणार रेशन दुकानांचे बँकेत रुपांतर 

मुंबई :

 लवकरच सर्वसामान्यांना रेशन दुकानातूनही बँकिगचे व्यवहार करता यावेत, यासाठी वित्तीय क्षेत्रातील अग्रगण्य बँक आयडीएफसी लवकरच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील प्रतिनिधींची (पीडीएस) बँकिग व्यवसाय प्रतिनिधी म्हणून नेमणूक करणार आहे. यामुळे अद्याप बँकिग सेवा न पोचलेल्या ग्रामीण भागातील जनतेला याचा मोठा लाभ होणार आहे. सध्या अनेक राज्य सरकारांकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे डिजीटायजेशन करून इ-देयक यंत्रणा स्वीकारण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. यानुसार रेशन वितरकांना ग्राहक बनवून सेवा देण्याऐवजी थेट त्यांना आपला व्यावसायिक भागीदार बनवण्यासाठी आयडीएफसी सध्या संधीच्या शोधात आहे. विविध राज्य सरकारांकडून चलन विरहीत इ-देयक प्रणाली राबविण्यासंदर्भात सुरू केलेल्या कार्यक्रमांना आयडीएफसी आपले जाळे विस्तारीत करण्याची संधी म्हणून पाहत आहे. आतापर्यंत आंध्र आणि महाराष्ट्रामध्ये या बँकेला चलन विरहीत ई-देयक यंत्रणा प्रस्थापित करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. तर हरियाणा सरकारशी यासंदर्भात बोलणी प्रगतीपथावर असल्याचे आयडीएफसीच्या अधिकाऱयांनी दिली.