|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिह्यात स्कॉलरशिप परीक्षेला सामोरे गेले 5,979 विद्यार्थी

जिह्यात स्कॉलरशिप परीक्षेला सामोरे गेले 5,979 विद्यार्थी 

‘तरूण भारत’ ची स्कॉलरशिप मित्र’ पुस्तिका ठरली मार्गदर्शक

नव्या परिक्षा पध्दतीचा मिळाले विद्यार्थ्यांना मार्गदशन

 

प्रतिनिधी /रत्नागिरी

पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा रत्नागिरी जिल्हय़ात उत्साहात पार पडली. त्यामध्ये इ. 5वी मधील 10 हजार 541 तर इ. 8 वी च्या 5 हजार 979 विद्यार्थी या परिक्षेला सामोरे गेले आहेत. परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ‘तरूण भारत’ ची स्कॉलरशिप मित्र पुस्तिका मार्गदर्शक ठरल्याची प्रतिक्रिया विद्यार्थीवर्गातून दिली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाकडुन शिष्यवृत्ती परिक्षेचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व निरंतर शिक्षण विभागस्तरावरून परिक्षेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली होती. जिल्हय़ातून एकूण 16 हजार 635 विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 16 हजार 520 विद्यार्थ्यांनी दोन्ही विषयांच्या शिष्यवृत्तीची परिक्षा दिली आहे.

मंडणगड तालुक्यातून पाचवीसाठी 448 व आठवीसाठी 141, दापोली तालुक्यातून पाचवीसाठी 1224 व आठवीसाठी 689, खेडमध्ये पाचवीसाठी 1389 व आठवीसाठी 883, गुहागरमध्ये पाचवीसाठी 811 व आठवीसाठी 440, चिपळूणमध्ये पाचवीसाठी 1582 व आठवीसाठी 1006, संगमेश्वर पाचवीसाठी 1311 व आठवीसाठी681, रत्नागिरी पाचवीसाठी 1853 व आठवीसाठी 1169, लांजा पाचवीसाठी 855 व आठवीसाठी438 व राजापूर पाचवीसाठी 1068 व आठवीसाठी 532 विद्यर्थ्यांनी परिक्षा दिली आहे.

तरूण भारत ‘स्कॉलरशिप मित्र’ पुस्तिकेचा बोलबाला

तरुण भारत ने या परिक्षेला विद्यार्थ्यांना मार्गदर्शक अशी ‘स्कॉलरशिप मित्र’ पुस्तिका यावर्षी काढली होती. त्या पुस्तिकेचा विद्यर्थ्यांमध्ये बोलबाला झाला. ज्ञान रचनावादी अध्यापन पध्दतीवर आधारीत प्रश्न प्रकार, अभ्यासक्रम यामुळे या परिक्षेत प्रचंड उत्सुकता होती. या परिक्षांची मार्गदर्शक पुस्तकांची वानवा, अभ्यासक्रम व परिक्षा पध्दतीबाबतचे नाविन्य, मार्गदर्शनाचा अभाव यामुळे पालकांच्यात संभ्रम होता. हीच बाब ओळखून तरूणभारतने ही पुस्तिका जिल्हास्तरावर प्रकाशित केली होती. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ञांच्या मदतीने ही पुस्तिका छापण्यात आली. त्याचे सर्वत्र स्वागत झाले. प्रकाशनानंतर ही पुस्तिका विद्यर्थ्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. नव्या अभ्यासक्रमात नव्या परिक्षा पध्दतीत या पुस्तिकेचा खुपच फायदा झाल्याचे बोलले जात आहे. पुढीलवर्षीही अशी पुस्तिका विद्यार्थ्यांना मिळावी अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून केली जात आहे.