|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वटवृक्षाला आग लागल्याने आंब्रड-कणकवली मार्ग ठप्प

वटवृक्षाला आग लागल्याने आंब्रड-कणकवली मार्ग ठप्प 

आंब्रड : आंब्रड खडगदे नदीवरील पुलानजीक जुनाट वडाला आग लागून भल्या मोठय़ा फांद्या रस्त्यावर कोसळल्या. ही दुर्घटना मंगळवारी रात्री उशिरा झाली, तरी झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने बुधवारी दुपारपर्यंत आंब्रड-कसवण-कणकवली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या दुर्घटनेमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे काहीसे हाल झाले.

आंब्रड चव्हाटा येथे आजूबाजूला लागलेली आग मंगळवारी रात्री तेथील एका महाकाय वटवृक्षाला लागली. रात्री सुमारे 12 वाजल्यानंतर ही आग लागल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. ही आग पसरत जाऊन भल्या मोठय़ा फांद्या रस्त्यावर कोसळल्या. फांद्या मोठय़ा असल्याने आंब्रड-कणकवली मार्गावर वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. काही प्रमाणात फांद्या दूर करून दुचाकी व कसरत करून रिक्षा वाहतूक होईल, एवढा मार्ग सुरळीत करण्यात आला. मात्र दुपारी 12 वा. नंतर ग्रामस्थांनी हे झाड दूर करून वाहतूक पूर्ववत केली. घटनेमुळे आंब्रड येथून कणकवली येथे परीक्षेला जाणाऱया बारावीच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यांना खासगी वाहनांद्वारे ओसरगावमार्गे कणकवली गाठावी लागली.

 

Related posts: