|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » डी.वाय. पाटील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून पावनगडाची स्वच्छता

डी.वाय. पाटील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून पावनगडाची स्वच्छता 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागातर्फे किल्ले पावनगडावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेतंर्गत गडावरील विहीर परिसर, तुपाची विहीर, गणेश मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, दारुगोळा साठवण्याचा परिसर, चाँद सुरज बुरुज, झेंडा बुरुज आदी परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी निसर्गप्रेमी उमाकांत चव्हाण यांनी स्वयंसेवकांना पावनगडाची माहिती दिली. मोहिमेमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रमोद चौगुले, राहूल पाटील, मुजम्मील कदीर, निरंजन चौगुले, अक्षय कुंभार, सृष्टी संकपाळ, जैद हुदली, नेहा रेपे, शुभांगी काळुखे, वैष्णवी कानेटकर, धनंजय शेंदे, विशाल घाटगे आदी सहभागी झाले होते.