|Monday, October 22, 2018
You are here: Home » Top News » 26/11  हल्ल्याचा पुन्हा एकदा तपास करा : भारताने पकिस्तानला ठणकावले

26/11  हल्ल्याचा पुन्हा एकदा तपास करा : भारताने पकिस्तानला ठणकावले 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदह मुंबई  26/11  दहशतवादी हल्ल्याचा तपास करत जमात -उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदवर दहशतवादी विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करायला सांगितले आहे. पाकिस्तानने भारताकडे 24 साक्षी दारांना जबाब नोंदवण्यासाठी पाठवण्याचा आग्रह केल्यानंतर भारताने ही नवीन मागणी केली आहे.

अधिकाऱयाने सांगितले आहे की, ‘आम्ही पाठवलेल्या पत्राला उत्तर देताना भारत सरकारकडून हे उत्तर आले आहे. आम्ही केलेल्या आग्रहावर लक्ष देण्याऐवजी भारताने याप्रकरणी पुन्हा नव्याने तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद आणि उपलब्ध करून देण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे लष्कर-ए- तोयबाचा कमांड जकीउर रहमान लखवी यांच्यावर खटला चालवण्याची मागणी केली आहे.

Related posts: