|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » Top News » भारताकडून 39 पाकिस्तानी कैद्यांची सुटका

भारताकडून 39 पाकिस्तानी कैद्यांची सुटका 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारताने बुधवारी पाकिस्तानी नागरिकांची कारागृहातून सुटका केली. यात 18 मच्छिमार आणि अन्य 21 कैद्यांचा समावेश आहे. यातील 21 कैद्यांनी त्यांना सुनविण्यात आलेली शिक्षा भोगली असल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे.

या सर्वांना वाघा बॉर्डवर पाकिस्तानी अथॉरिटीकडे सोपविण्यात आले. मानवतावावादी दृष्टीकोन ठेवून या मच्छिमार आणि आरोपिंची सुटका करण्यात आली आहे. पाकस्तानाही त्यांच्या कारागृहातलि भारतीय नागरिकांची लवकरच सुटका करेल. असे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, सीमापार गेलेला भारतीय जवान चंदूलाल चव्हाण यांनी त्यांची सुटका केल्यानंतर पाकिस्तान- भारतातील तणावाचे संबंध कमी होऊन सकारत्मक प्रक्रियह सुरू झाली आहे.

 

Related posts: