|Thursday, July 18, 2019
You are here: Home » leadingnews » केरळच्या मुख्यमंत्र्यांचे शीर कापणाऱयाला एक कोटींचे बक्षीस : आरएसएस

केरळच्या मुख्यमंत्र्यांचे शीर कापणाऱयाला एक कोटींचे बक्षीस : आरएसएस 

ऑनलाईन टीम / केरळ :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर प्रचार प्रमुख डॉ. कुंदन चंद्रावत यांची जीभ घसरली असून ‘केरळच्या मुख्यमंत्र्यांचे शीर कापून आणणाऱया व्यक्तीला एक कोटी रूपये देईन असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. केरळमध्ये होत असलेल्या हिंसेचा निषेध करण्यासाठी आयोजित जनसभेमध्ये त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

उज्जैनमधील शहीद पार्कमध्ये बोलताना चंद्रावत यांनी विखारी विधान केले आहे. केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या स्वयंसेवकांच्या होत असलेल्या हत्यांचा निषेध करण्यासाठी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला खासदार चिंतामणी मालवीय आणि आमदार मोहन यादव देखील उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर प्रचर प्रमुख असलेल्या डॉ.कुंदन चंद्रावत यांनी लोकप्रतिनिधींसमोर अनेक वादग्रस्त विधान केली. ‘गोध्राचे हत्याकांड विसरलात का? 56 मारण्यात आले होते. 2 हजार लोकांना कब्रस्तानाला पाठवले होते. जमिनीखाली गाडले होते, याच हिंदू समाजाने आता तुम्ही 300 प्रचारक आणि स्वयंसेवकांची हत्या केली आहे. डाव्यांनी ऐकून घ्यावे, तीन लाख लोकांचे शीर कापून त्यांची माळ भारत मातेला अर्पण करू’ अशी चेथावणीखोर भाषा चंद्रावत यांनी वापरली होती.