|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हा परिषदेतील सेना गटनेतेपदी उदय बने

जिल्हा परिषदेतील सेना गटनेतेपदी उदय बने 

 

पं.स.शिवसेना गटनेतेपदी उत्तम मारे यांची वर्णी

अध्यक्ष निवड 21 मार्च व पं.स.सभापती 14 मार्च ला

 

प्रतिनिधी /रत्नागिरी

निवडणुक निकालानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडीकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे. जि. प. अध्यक्षपदासाठी 21 मार्च रोजी तर पं.स सभापतीपदासाठी 14 मार्च रोजी निवडणूक होत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता स्थापन करणाऱया शिवसेनेच्या गटनेतेपदी सर्वात अनुभवी व ज्येष्ठ सदस्य उदय बने यांची तर व रत्नागिरी पंचायत समितीच्या गटनेतेपदी उत्तम मोरे यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत 55 जागांपैकी तब्बल 39 जागांवर विजय मिळवला आहे. दक्षिण रत्नागिरीत रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर याठिकाणी निर्भेळ यश मिळवले होते. या निकालानंतर आता जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदासाठी व पंचायत समित्यांवर सभापतीपदांसाठी इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला प्रारंभ झाला आहे.

पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी येत्या 14 मार्च रोजी निवड होणार आहे. तर जिल्हा परिषदेच्या पूर्वीच्या कार्यकारिणीचा कार्यकाल 20 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी 21 मार्च रोजी निवड प्रक्रिया होणार आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या सदस्यांच्या गटनेतेपदासाठी शिवसेनेने शुक्रवारी बैठक बोलावली होती. जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची बैठक जिल्हा परिषदेत पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषदेत गटनेतेपदी जेष्ठ व राजकारणातील अभ्यासू सदस्य म्हणून उदय बने यांची एकमताने निवड करण्या आली आहे. तर रत्नागिरी पंचायत समितीमधील शिवसेनेच्या गटनेतेपदी उत्तम मोरे यांची निवड झाली आहे. या निवड प्रक्रियेवेळी तालुकाप्रमुख बंडय़ा साळवी, सदस्य बाळशेठ जाधव, तात्या सरवणकर, सौ. रचना महाडिक, आदी सदस्य उपस्थित होते.

Related posts: