|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिला हॉकी संघ विजयी

भारतीय महिला हॉकी संघ विजयी 

वृत्तसंस्था / भोपाळ

गुरूवारी येथे खेळविण्यात आलेल्या महिलांच्या पहिल्या हॉकी कसोटीत यजमान भारताने बेलारूसचा 5-1 अशा गोल फरकाने दणदणीत पराभव केला. आशियाई चॅम्पियन्स चषक महिलांच्या हॉकी स्पर्धेत जेतेपद मिळविल्यानंतर भारतीय महिला संघाचा हा पहिला सामना होता.

गुरूवाच्या सामन्यात 11 व्या मिनिटाला भारताचे खाते पेनल्टी कॉर्नरवर उघडले. त्यानंतर 15 व्या मिनिटाला नवज्योत कौरने मैदानी गोल करून भारताची आघाडी 2-0 अशी वाढविली. 29 व्या मिनिटाला पूनम बर्लाने मैदानी गोल करून भारताची स्थिती अधिक भक्कम केली. 37 व्या मिनिटाला बेलारूसचा एकमेव गोल स्वेतलाना बेहुसेव्हिचने केला.  70 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार दीप ग्रेस एक्काने भारताचा चौथा गोल तर 60 व्या मिनिटाला गुरजित कौरने भारताचा पाचवा आणि शेवटचा गोल नोंदवून बेलारूसचे आव्हान संपुष्टात आणले.

Related posts: