|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरज सोलापूर रेल्वे पुन्हा सुरू होणार

मिरज सोलापूर रेल्वे पुन्हा सुरू होणार 

पंढरपूर / प्रतिनिधी

मिरज सोलापूर ही बंद करण्यात आलेले रेल्वेगाडी परत एकदा सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा एक अहवाल रेल्वे मुख्यालयाकडे दिला आहे. तेथून आणि मध्य रेल्वे तसेच सोलापूर विभागांकडून या रेल्वेसंदर्भात सकारात्मकता आहे. त्यामुळे ही रेल्वेगाडी नक्कीच सुरू होईल. असा विश्वास रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी श्री आर.के. शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

    मध्य रेल्वेचे सब डिव्हीहजनल जनरल मॅनेजर  आशुतोष गांगल आज रेल्वे स्थानक तपासणीसाठी पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी विठठलांचे दर्शन घेतले. त्यानंतर रेल्वेप्रश्नासंदर्भात त्यांनी रेल्वे स्थानक फ्ढिरून तपासणी देखिल केली. याप्रसंगी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी तसेच इतही अधिकारी उपस्थित होते.

   मिरज सोलापूर ही दैनंदिन जाणारी रेल्वेगाडी होती. मात्र ही रेल्वेगाडी गेल्या काही दिवसापासून बंद करण्यात आली आहे. याबाबत प्रवाशी संघटनांनी सदरची रेल्वेगाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. मात्र  याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. यासंबधीचा एक अहवाल आणि प्रवाश्यांची मागणी ही रेल्वे प्रशासनाने रेल्वे मुख्यालयाकडे दिली आहे. आणि तेथूनच या मागणीबाबत सकारात्मकता दिसून येत आहे.

यावेळी पंढरपूर – मुंबई ही फ्ढास्ट पॅसेंजर दैनंदिन सुरू का होत नाही ? असा सवाल त्यंना करण्यात आला. यावर सध्या मुंबई येथे प्लॅटफ्ढाŸर्मची कमी आहे. तेथे सुविधा निर्माण झाल्यावरच ही गाडी दैनंदिन करण्यात येईल. तोपर्यत मुंबई रेल्वेगाडी पंढरपूरहून दैनंदिन होणे अशक्य असल्यांचे त्यांनी सांगितले.

याशिवाय नव्याने मंजूर करण्यात आलेल्या फ्ढलटण ते पंढरपूर रेल्वेमार्गासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. याही मार्गाबाबातची सर्व प्रशासकीय बाबी या लवकरच पूर्ण करून या लोहमार्गाचे काम सुरू होईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

मिरज सोलापूर ही रेल्वेगाडी जरी सध्या प्रवाश्याच्या सेवेसाठी समजली जात असली. तरी देखिल सदरची रेल्वेगाडी ही सोलापूर जिल्हावासिंयाच्या दृष्टीने आरोग्यवाहीनी समजली जाते. कारण मिरज येथे अनेक प्रकारच्या वैद्यकीय सेवा या काही इस्पितळामधून मोफ्ढत आहेत. यामधे कर्करोगासारख्या रोंगाचे प्रमाण जास्त आहे. अशा आजारांने त्रस्त असलेले अनेक रूग्ण हे या रेल्वेगाडीने मिरज येथे ये- जा करीत असतात. सदरच्या गाडीमधून प्रवास करणा-या एकूण प्रवाश्यांपैकी सर्वाधिक प्रवासी हे वैद्यकीय कारणासाठीच प्रवास करीत असतात. त्यामुळे सदरची रेल्वेगाडी ही आरोग्यवाहीनी आहे. त्यामुळे ही गाडी लवकर सुरू करण्यांची मागणी सध्या होत आहे.

Related posts: