|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शिवसेना नगरसेविकेसह 10 जणांना अटक

शिवसेना नगरसेविकेसह 10 जणांना अटक 

 

परटवणे येथे दोन गटात शुक्रवारी रात्री राडा

प्रतिनिधी /रत्नागिरी

शहरातील परटवणे येथे शुक्रवारी रात्री दोन गटात जोरदार राडा झाला. यात विनयभंग केल्याबाबत परस्परविरोधी तक्रार देण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना नगरसेविका वैभवी विजय खेडेकर यांच्यासह 10 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र धोंडू खेडेकर (48), अविनाश धोंडू खेडेकर (44), पियुश रविंद्र खेडेकर (19, तिघेही राहणार परटवणे, खेडेकरवाडी, रत्नागिरी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अन्य फिर्यादीनुसार, प्रविण प्रकाश खेडेकर (33), प्रशांत प्रकाश खेडेकर(31), विशाल काशिनाथ खेडेकर(34), प्राजक्ता प्रशांत खेडेकर, पुनम प्रवीण खेडेकर, वैभवी विजय खेडेकर 32, निर्मला गोविंद खेडेकर (60) अशा 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री 10.45 च्या सुमारास परटवणे येथे हा राडा झाला. यामध्ये एका फिर्यादीनुसार, रविंद्र खेडेकरसह तिघांनी ही महिला पतीसह परटवणे येथून दुचाकीवरून जात असताना पुर्व वाकडिकीचा राग मनात धरून अश्लील शिवीगाळ केली. यामध्ये दुसऱया महिलेच्या फिर्यादीनुसार, प्रविण खेडेकर, वैभवी खेडेकर यांच्यासह 7 जणांनी पूर्व वैमनस्याच्या रागातून गैरकायदा जमाव केला. यातील तिघांनी या महिलेला अश्लिल शिवीगाळ केली. मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. लैगिक शेरेबाजी केली. तसेच शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकणीही शनिवारी या दहा जणांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. शहर पोलीस याप्रकरणी अधीक तपास करत आहेत.

Related posts: