|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कुपवाड खुनीहल्ला प्रकरणी पाच हल्लेखोर गजाआड

कुपवाड खुनीहल्ला प्रकरणी पाच हल्लेखोर गजाआड 

कुपवाड / वार्ताहर

कुपवाडमधील रोहीदास चौकातील आर्यन पानपट्टीवर शुक्रवारी मावा घेताना झालेल्या भांडणातुन अज्ञातांनी कुपवाडमधील शाहरुख फारुक मकानदार (25, रा.बुधगांव रोड) या तरुणाला दगडाने मारहाण करुन धारदार शस्त्रानी खुनीहल्ला केला होता. याप्रकरणी कुपवाड पोलिसांच्या डीबी पथकाने शुक्रवारी रात्री संजयनगर भागात शोधमोहीम राबवुन पाच संशयीतांना गजाआड केले आहे.

 यामध्ये मुख्य सुत्रधार शुभम संतोष रसाळ (21), सागर अमृत कदम (22), आकाश समाधान कांबळे (21), गौस उर्फ सलमान दिलावर सय्यद (19) व रोहीत जगन्नाथ आवळे (21, सर्व रा.संजयनगर, सांगली) यांचा समावेश आहे. यांच्या विरोधात शाहरुख मकानदार याने फिर्याद दिली असुन पाचजणांना नऊ मार्चपर्यंत पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश शनिवारी मिरज न्यायालयाने सुनावला. दरम्यान, खुनीहल्ला प्रकरणी अटक केलेले पाचजण पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांच्यावर संजयनगर पोलिसांत खुनीहल्ला, गर्दी मारामारी, धारदार शस्त्रांचा धाक दाखवुन दहशत माजवणे याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, जखमी शाहरुख मकानदार शुक्रवारी सायंकाळी रोहीदास चौकातील शुभम रसाळ याच्या आर्यन पानपट्टीत मावा घेण्यासाठी गेला होता. शाहरुखने पैसे न दिल्याने मावा लवकर दिला न्हवता. त्य़ामुळे शाहरुखने शुभमला शिवीगाळ करुन वाद घातला. यावेळी वाद चिघळल्याने शुभमने शाहरुख विरोधात पोलिसांत तक्रार दिली आणि संजयनगरमधील सागर कदम, आकाश कांबळे, सलमान सय्यद, रोहीत आवळे यांसह अन्य साथीदारांना बोलावुन घेतले. शाहरुख पानपट्टीसमोरच थांबल्याने शुभम व त्याच्या साथीदारांनी चिडुन शाहरुखवर दगडाने हल्ला करुन धारदार शस्त्रांनी वार केला. गंभीर जखमी करुन सर्व हल्लेखोर पसार झाले होते. शुक्रवारी रात्री पो.निरीक्षक अशोक भवड यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख प्रविण यादव, महेश जाधव, नितीन मोरे, रमेश जाधव, कृष्णा गोंजारी यांनी संजयनगर भागात पाचजणांना अटक केली. अधिक तपास निरीक्षक अशोक भवड करीत आहेत.

 

Related posts: