|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » उजनीमधून भीमेत 2900 क्सुसेकचा विसर्ग

उजनीमधून भीमेत 2900 क्सुसेकचा विसर्ग 

पंढरपूर / प्रतिनिधी

सोलापूर जिल्हयांची वरदायिनी असणा-या उजनी धरणामधून सध्या भीमेत 2900 क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे. सदरचे पाणी सोलापूरच्या पाणीपुरवठयासाठी सोडले जात आहे. तसेच यांचा फ्ढायदा हा सोलापूर , पंढरपूर वासिंयाना होणार आहे.

   सध्या उजनी धरणांची पातळी ही 494.450 मीटर इतकी आहे. तर 2597.85 दलघमी इतका एकूण साठा आहे . यामधे 795.04दलघमी इतका उपयुक्त साठा शिल्लक आहे. धरणांची शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यतची एकूण टक्केवारी ही 52.40 टक्के इतकी आहे. उजनी धरणामधून सध्या विजनिर्मिती साठी 1600 क्युसेक आणि सांडवा मधून 1300 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. असे एकंदरीत 2900 क्युसेक इतके पाणी हे भीमा नदीमधे सोडले गेले आहे.

 उजनीमधून भीमा नदीमधे सोडण्यात आलेले पाणी हे पंढरपूर येथे साधारणपणे मंगळवारी रात्री उशिराने पोहचेल. तर सदरचे पाणी हे सोलापूर शहरांला पाणीपुरवठा करणा-या औज बंधा-यामधे सात दिवसानंतर म्हणजेच 10 फ्sढब्रुवारींच्या आसपास पोहचणार आहे. त्यामुळे या आठवडयात पंढरपूर आणि सोलापूर वास्ंिायांची तहान ही नक्कीच भागली जाणार आहे.

  पंढरपूर शहरांला पाणीपुरवठा करणा-या बंधा-यामधे सुमारे 1 महीना पुरेल इतके पाणी आहे. तर सोलापूर शहरांला पाणीपुरवठ करणा-या औज बंधा-यात 8 दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. या पार्श्वभमीवर सोलापूरच्या पाणीपुरवठयासाठया  सध्या 2900 क्युसेक पाणी सोडले जात आहे. मात्र सदरच्या पाण्याचा विसर्ग हा शनिवारी रात्री उशिरांने वधारून 6 हजार क्युसेक पर्यत जाण्यांची शक्यता आहे. सदरच्या उजनीमधून सोडलेल्या पाण्याने भीमा नदीवरील पिण्यांचे पाणीपुरवठ करणारे बंधारे हे 3 मीटरपर्यत भरून घेतले जाणार आहे. यामुळे पुढील तीन महीन्यांपर्यतची पाण्याची चिंता मिटणार आहे.