|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रायबाग तालुक्मयातील विवाहितेवर बलात्कार

रायबाग तालुक्मयातील विवाहितेवर बलात्कार 

प्रतिनिधी/ बेळगाव

निपनाळ (ता. रायबाग) येथील एका विवाहितेवर बलात्कार झाला आहे. शुक्रवारी 3 मार्च रोजी या संबंधी रायबाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्या त्रस्त महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या संबंधी श्रीकांत यल्लाप्पा मरदी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फूस लावून गेल्या एक वर्षापासून या तरुणाने 25 वषीय महिलेवर सातत्याने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला असून या कामी श्रीकांतला सहकार्य करणाऱया आणखी तिघा जणांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री त्या त्रस्त महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या संबंधी रायबाग पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता संशयित आरोपीला अद्याप अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रायबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.  

Related posts: