|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » मुस्लिमांनी अल्पसंख्याक गटातून बाहेर पडावे ; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

मुस्लिमांनी अल्पसंख्याक गटातून बाहेर पडावे ; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य 

ऑनलाईन टीम / लखनौ :

भारतात मुस्लिमांची लोकसंख्या इतकी मोठी आहे की त्यांनी आता अल्पसंख्याक गटातून बाहेर पडावे, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी केले.

अल्पसंख्याकाच्या विषयावर चर्चा करताना गिरीराज सिंहांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, भारतात मुस्लिमांची लोकसंख्या खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांनी आता अल्पसंख्याक गटातून बाहेर पडावे. तसेच ते पुढे म्हणाले, अल्पसंख्याक हा विषय खूप गंभीर त्यामुळे या विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.