|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » राजीनामे बाजूला ठेवण्यात आले आहेत : रामदास कदम

राजीनामे बाजूला ठेवण्यात आले आहेत : रामदास कदम 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सध्या आमचे राजीनामे बाजूला ठेवण्यात आले आहेत. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यास आम्ही आमचे राजीनामे केव्हाही देण्यासाठी तयार आहोत, असे राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी सांगितले.

मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कदम बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे मंत्री आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतो, असे म्हणत होते. मात्र, आता हे राजीनामे बाजूला ठेवण्यात आले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले, फक्त मुंबईतच नाहीतर संपूर्ण राज्यात पारदर्शकता हवी. ज्याप्रमाणे मुंबई महापालिकेत उपायुक्त दिला जाणार आहे, त्याचप्रमाणे राज्यातील सर्व प्रमुख महानगरपालिकांमध्ये उपायुक्ताची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी कदम यांनी केली.

दरम्यान, जर उत्तर प्रदेशमधील शेतकऱयांना कर्जमाफी दिली जाते तर महाराष्ट्रात का दिली जात नाही, असा सवालही कदम यांनी उपस्थित केला.

Related posts: