काँग्रेसच्या महिल्या आमदराला मेबाईलवर अश्लील मसेज , पोलिसांत तक्रार दाखल

ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील काँग्रेस आमदार वर्ष गायकवाड यांना मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने अश्लील मसेज पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वर्षा गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महिला नेत्यांना अश्लील मेसेज पाठवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. सोमवारी रात्री उशीरा काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वर्षा गायकवाड यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने अश्लील भाषेतील मेसेज पाठवले होते. शेवटी या प्रकरणी वर्षा गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा सायबर गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.