|Sunday, January 20, 2019
You are here: Home » Automobiles » 17 महिन्यात 1.30 लाख रेनॉल्ट क्विड कार्सची विक्री

17 महिन्यात 1.30 लाख रेनॉल्ट क्विड कार्सची विक्री 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

बेबी डस्टर अशी ओळख असलेली रेनॉल्ट क्विड कारला सध्या चांगली पसंती मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. चांगले फिचर्स आणि कमी किंमत यामुळे अनेकांनी या कारला पसंती दिली. सप्टेंबर 2015 साली आलेली ही या कारची अवघ्या 17 महिन्यांत 1.30 लाख युनिटची विक्री झाली आहे.

कपंनीने सुरूवातीला 0.8सीसी इंजिन दिले होते. त्यानंतर 1.9 लीटर इंजिन देण्यात आले. यासारखे अनेक बदल करून क्विडने ग्राहकांना आकर्षित केले आहे. रेनॉल्टने जारी केलेल्या एका अधिकृत पत्रकानुसार, 2016च्या शेवटपर्यंत कंपनीची बाजारातील एकूण भागीदारी 4.5 टक्क्यांपर्यंत पोहचली होती. 2015च्या तुलनेत कंपनीच्या वाढीत तीन अंकांची वृद्धी झाली होती. क्विडच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेली डॅटसन रेडी गो या कारनेही आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे.

Related posts: