|Friday, May 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 5 वर्षाखालील बालकांचे मृत्यू रोखण्यास भारताला अपयश

5 वर्षाखालील बालकांचे मृत्यू रोखण्यास भारताला अपयश 

नवी दिल्ली

 पर्यावरण आणि तोकडी असणारी आरोग्य सेवा यामुळे 5 वर्षांखालील मृत्यू प्रकरणी भारत दुसऱया क्रमांकावर आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे. आग्नेय आशियातील बांगलादेश, इंडोनेशिया आणि भूतान या देशांतसुद्धा हे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. चीनपेक्षा भारताची परिस्थिती दयनीय असून मृत्यूदरात अग्रगण्य असलेल्या जगातील 35 देशांत भारताचा क्रमांक वरचा असल्याचे आढळले आहे.  म्यानमारमध्ये देखील एक लाखामागे 297 बालकांचे मृत्यू घडतात. घरात व बाहेर वायुप्रदूषण, असुरक्षित पाणी, आरोग्य सेवा यामुळे 5 वर्षांखालील मुलांचे मृत्यू घडतात असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला. हात काळजीपूर्वक धुणे ही सामुदायिक सवय झाल्यास मोठय़ा प्रमाणातील डायरिया व श्वसन विकास यांना आळा बसू शकतो.

 

Related posts: