|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » झोपडपट्टीधारकांना मिळणार पक्की घरे

झोपडपट्टीधारकांना मिळणार पक्की घरे 

प्रतिनिधी / कराड

येथील बारा डबरे परिसरात पालिकेतर्फे साडेतीन कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या
घरकुल इमारतींची सोडत मंगळवारी पालिकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी चिठ्ठी पद्धतीने 152 घरकुल लाभार्थ्यांपैकी 108 लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते.

 येथील रूक्मिणीनगर, पाटण कॉलनी परिसरातील 152 झोपडपट्टीधारकांसाठी पालिकेने सुमारे साडे तीन कोटी रूपये खर्च करून बारा डबरी परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीशेजारी सहा इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. शहरातील ग्रामीण हद्दीत राहात असलेल्या गरीब लाभार्थी कुटुंबांचा नगरपालिकेने 2009 मध्ये सर्व्हे केला होता. त्यातून 152 लाभार्थ्यांची निवडही केली होती. 2009 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेतून निवडलेल्या लाभार्थ्यांना बाराडबरी परिसरात बांधण्यात येणाऱया घरकुल प्रकल्पाचा लाभ दिला                   जाणार असल्याचे पालिकेकडून लाभार्थ्यांना सांगण्यात आले होते. मात्र, नावावर
 घरकुल प्रकल्पातील खोल्या असूनदेखील निव्वळ स्थायी समितीच्या बैठकीअभावी व घोषणेअभावी त्यांना त्या खोल्या मिळू शकलेल्या नाहीत. त्या घरकुलांचे मंगळवारी पालिकेत वाटप करण्यात आले.

152 लाभार्थ्यांपैकी 127 लाभार्थ्यांनी घरकुलाचा लाभार्थी हिस्सा म्हणून आठ हजार रूपये भरले आहेत. त्यांच्यापैकी मंगळवारी 108 लाभार्थ्यांना घरकुलाचे चिट्टी टाकून वाटप करण्यात आले. यावेळी पालिकेत रूक्मिणीनगर, पाटणकर कॉलनी, ऑक्सिडेशन पॉईट, बाराडबरी परिसरातील लाभार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. बारा डबरे येथे या योजनेंतर्गत सहा इमारती बांधण्यात आल्या आहेत. ही योजना पूर्ण होण्यासाठी निधीची अडचण निर्माण झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या योजनेसाठी
नगरपालिकेला शासनाने दोनदा निधी मंजूर केला होता.

Related posts: