|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » आयसीस दहशतवाद्याला भारतात पहिल्यांदा कंठस्नान

आयसीस दहशतवाद्याला भारतात पहिल्यांदा कंठस्नान 

ऑनलाईन टीम / लखनऊ  :

उत्तर प्रदेशातील ठाकूरगंजमध्ये लपलेल्या संशयित दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे नाव सैफुल्लाह असून तो आयसिसशी संबंधित असल्याची माहिती एसटीएन दिली आहे.

आतापर्यंत भारतात आयसिसकडून दहशतवादी हल्ला झाला नव्हता. त्यामुळे देशात आयसिसने घडवलेला हा पहिलाच हल्ला मानला जात आहे. सोबतच आयसिसके भारतात शिरकाव केल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। ठाकूरगंज हा वर्दळाची भाग म्हणून ओळग्खला जातो. इथून उत्तर प्रदेश विधानसभा 8 किमी अंतरावर आहे. विशेष म्हणजे सध्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचे वातावरण असल्याने हे प्रकरण गंभरि मानले जात आहे. ज्या घरात हा दहशतवादी लपून बसला होता, त्या इमारतीत रात्री पोलिस आणि एटीएसने प्रवेश केला. त्यानेतर रात्री उशीरापर्यंत एटीएस आणि दहशतवाद्यामध्ये गोळीबार सुरू होता. इमारतीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडे मोठय़ा प्रमाणात हत्यारे असल्याने त्याच्याकडून गोळीबार सुरू होता. अखेर अकरा तासांनंतर त्याला ठार करण्यात यश आले. त्याआधीच कारवाई दयम्यान पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा आणि मिरची बॉम्ब फेडले.