|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » leadingnews » अखेर आमदार परिचारक निलंबित ; ‘ते’ वक्तव्य भोवले

अखेर आमदार परिचारक निलंबित ; ‘ते’ वक्तव्य भोवले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भारतीय लष्करातील जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांना याप्रकरणाचा पुढील अहवाल येईपर्यंत निलंबित करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

आमदार परिचारक यांनी सीमेवर लढणाऱया जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला. विरोधकांकडून त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरण्यात येत होती. या सर्व घडामोडीनंतर परिचारकांनी आपल्या वकिलांमार्फत ‘त्या’ वक्तव्याबद्दल महिला आयोगासमोर माफीनामा सादर केला.

मात्र, विरोधक त्यांच्या निलंबनावर ठाम होते. विरोधकांनी सभागृहाचे कामकाज चालू न देण्याचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर परिचारकांच्या वक्तव्याच्या चौकशीसाठी समिती नेमणार असून, या समितीचा अहवाल येईपर्यंत परिचारकांना निलंबित करण्यात येत असल्याचे पाटील म्हणाले.

Related posts: