|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Automobiles » 20 किमी/तास धावणार Moar इलेक्ट्रिक बाइक

20 किमी/तास धावणार Moar इलेक्ट्रिक बाइक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जगभरातील ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये इंधनावर फोकस करत इलेक्ट्रिक बाइक लाँच करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे Moar या कंपनीने आपली नवी इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. ही बाइक 20 किमी/तास धावू शकणार आहे.

असे असतील या इलेक्ट्रिक बाइकचे फिचर्स –

– टायर – 24 इंचचे टायर देण्यात आले असून या टायर्सना स्पोर्टी लूक देण्यात आले आहेत.

– लाईटस् – या बाइकमध्ये एलईडी हेडलाईटस्, ब्रेक लाइटस्सह हायड्रॉलिक असिस्टिड डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत.

– विशेष फिचर्स – कंपनीकडून पहिल्यांदाच फोल्डिंग मॅकेनिझमचा वापर या इलेक्ट्रिक बाइकमध्ये करण्यात आला आहे.

– तसेच या बाइकला एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी नेण्यासाठी फोल्डिंगचे फिचर्स देण्यात आले आहे.

– किंमत – 66 हजार 623 रुपये.