|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » केजरीवालांच्या निर्णयाला नायब राज्यपालांकडून ‘केराची टोपली’

केजरीवालांच्या निर्णयाला नायब राज्यपालांकडून ‘केराची टोपली’ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय लष्करातील सेवानिवृत्त जवान राम किशन ग्रेवाल यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याबाबतची फाईल दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी परत पाठवली आहे. त्यामुळे बैजल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निर्णयाला एकप्रकारे ‘केराची टोपली’ दाखवली आहे.

मागील वर्षी दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘वन रँक वन पेंशन’च्या मागणीसाठी आंदोलन करणारे सेवानिवृत्त जवान ग्रेवाल यांनी त्याच काळात आत्महत्या केली होती. त्यानंतर दिल्ली सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. मात्र, जवान ग्रेवाल हे दिल्लीचे नागरिक नसून ते हरियाणाचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना दिल्ली सरकारकडून नुकसान भरपाई देता येऊ शकत नसल्याचे बैजल यांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे.