|Thursday, June 27, 2019
You are here: Home » leadingnews » दहा रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात

दहा रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दहा रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात आणण्यात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देण्यात आली आहे. तसेच दहा रुपयांच्या जुन्या नोटाही चलनात राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नसल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सातत्याने भासणारा चलनतुटवडा भरुन काढण्यासाठी आरबीआयकडून पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. तसेच आता आरबीआयकडून दहा रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. दहा रुपयांच्या नव्या नोटांमध्ये थोडेफार बदल करण्यात आले आहेत. यामध्ये छपाईचे 2017 हे वर्ष छापले जाणार असून, त्यावर रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असणार आहे. असे विविध बदल या नव्या नोटांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे.